रिंकू सिंग एक झंजावात .
रोमांचक सामन्यात शेवटच्या ओव्हरीत सलग पाच षटकार मारत जिंकला अतिशय रंगतदार सामना.
Rinku singh won the nail biting match for KKR.
मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयपीएलचा हंगाम चालू आहे आणि प्रत्येक मॅच ही अतिशय रोमांचकारी होत असताना आपल्याला दिसत आहे तसं बघायला गेलं तर आयपीएल म्हणलं म्हणजे आपल्या भारतात या दिवसात सर्वात जास्त पाहीली जाणारी गोष्ट. एक प्रकारे हा क्रिकेट प्रेमींसाठी हा सण असतो असं आपण म्हणू शकतो.आणि आयपीएल ने त्यांचा चाहत्यांना निराश न करता BCCI दरवर्षी आयपीएल च आयोजन उच्च दर्जाचं करत असते. म्हणूनच आयपीएल ही जगातली सर्वात पहिल्या क्रमांकाची t20 लीग आहे कारण यामध्ये प्रत्येक सामना हा अतिशय दिमाखदार व काळजाचा ठोका चुकावणारा असतो. नेहमीप्रमाणेच काल देखील एक असाच सामना झाला त्यात केकेआर ने गुजरात टायटन्सला हरवत शेवटच्या ओव्हर पर्यंत चाललेल्या या सामन्यात विजय मिळवला .पण या विजयाचा शिल्पकार ठरला रींकु. कोलकत्ता नाईट रायडर चा डावखुरा फलंदाज रिंकू सिंग चे नाव सध्या अतिशय जोरात गाजत आहे कारण तशी त्याने खेळी देखील करून दाखवली आहे त्याने दयाल च्या षटकात मध्ये शेवटच्या पाच चेंडूत पाच षटकार मारत आपल्या संघाला सामना जिंकून देत सर्वांची मन जिंकली.
![]() |
सौजन्य : BCCI |
व्हिडिओ पाहण्यााठी क्लिक करा https://www.iplt20.com/video
तर पहिल्या फेरीमध्ये गुजरातच्या संघाने जोरदार फलंदाजी करत 204 धावांचं विशाल लक्ष कोलकत्यासमोर उभ केल. सर्वांना असं वाटत होतं की हे लक्ष कठीण आहे. कारण सुरुवातीलाच कोलकत्याचे फलंदाज जलद बाद व्हायला लागले त्यानंतर मात्र व्यंकटेश अय्यर आणि कोलकत्याचा कर्णधार नीतिश राणा यांनी डाव सावरत त्यांची बाजू भक्कम केली पण त्यानंतर कर्णधार राणाच्या विकेट नंतर कोलकत्याचे फलंदाज एक एक करत बाद होऊ लागले,त्यातच राशीद खान ह्या गुजरातच्या अतिशय महत्त्वाच्या बॉलरने सलग तीन विकेट घेत हॅट्रिक घेतली सामना सुटेल अस वाटत असताना फलंदाजीला आला डावखुरा रिंकू सिंग आणि त्याने 19 व्या हरीमध्ये यश दयाल ला जोरदार फटके लावत हा रोमांचक सामना स्वतःच्या टीम कडे गेला व व 21 चेंडू 48 धावांची धडाकेबाज खेळी केली. लवकरच आता रिंकू सिंगला भारताच्या राष्ट्रीय संघात निवड होण्याची शक्यता दाट आहे.