धुळेकर जनतेसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर या येत आहे कारण शासनाकडून धुळे ते दादर त्री साप्ताहिक रेल्वेची सुरुवात करण्यात आलेली आहे नुकतेच त्याचे उद्घाटन धुळे येथे केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब जी दानवे यांच्या उपस्थितीत करण्यात आलेले आहे. 30 एप्रिल 2023 पासून या रेल्वे सेवेचा लाभ धुळेकर जनतेला घेता येईल. याप्रसंगी त्यांच्या सोबतच भुसावळ स्थानकाचे प्रमुख हे देखील उपस्थित होते तसेच धुळे जिल्ह्याचे खासदार सुभाष जी भामरे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, जळगावचे खासदार उमेश दादा पाटील धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील,माजी आमदार राजवर्धन जी कदमबांडे,धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुक शहा, भाजप धुळे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, धुळ्याच्या महापौर प्रतिभाताई चौधरी, धुळ्याचे माजी महापौर प्रदीप नाना करपे, तसेच चंद्रकांत सोनार हे देखील याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री रावसाहेब जी दानवे म्हणाले की धुळे ते दादर रेल्वेच्या माध्यमातून धुळेकर जनतेसाठी मुंबईचा प्रवास आता सविस्तर होणार आहे केंद्र सरकारच्या रेल्वे बाबत 13000 कोटीच्या निधी भविष्यात देखील अजून उपलब्ध होत आहे त्याद्वारे देशभरातील विविध रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी त्यांचा वापर होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले तसेच जी धुळे ते नरडाणा रेल्वे सुरू आहे तिचे आता आगामी दिवसात धुळे-नरडाणा-इंदूर असे विस्तारक रूपांतर करण्यात येणार असल्याचे रावसाहेब दानवे यांच्या भाषणात म्हणाले ले. धुळे ते दादर ही रेल्वे सेवा त्री साप्ताहिक असून सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटात ती धुळे येथून दादर साठी प्रस्थान करेन.
धुळे ते दादर रेल्वे प्रवासाचे स्वरूप व वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
वारंवारता : आठवड्यामध्ये ०३ दिवस
एक्स धुळे- सोमवार, मंगळवार आणि शनिवार
एक्स दादर- रविवार, सोमवार आणि शुक्रवार
थांबे :
शिरुड,जमदा,चाळीसगाव,नांदगाव,मनमाड, लासलगाव,निफाड,नाशिकरोड,इगतपुरी, कल्याण आणि ठाणे स्थानकांच्या दोन्ही बाजूने.
कॉम्पोजिशन :
एक एसी चेअर कारच्या समावेशासह ११ कोचेस, सेकंड क्लास सीटिंग आणि दोन सेकंड क्लास कम गार्डस ब्रेक व्हॅन ८.

