मित्रांनो बारावी झाल्यावर विद्यार्थी मित्रांना सर्वात जास्त पडणारा प्रश्न म्हणजे आता आपलं करिअर पुढे कोणत्या क्षेत्रात निवडायचं? कारण बारावी हा विद्यार्थी जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो कारण सर्वात जास्त करिअरच्या करण्याची संधी आणि पर्याय बारावी नंतर आपल्याला उपलब्ध असतात आणि आपलं भविष्यातील जीवनशैली किंवा आपलं भविष्य ते आपलं कसं राहील ते आपण निवड केलेल्या क्षेत्रावर अवलंबून असतं.या सर्व बाबी लक्षात विद्यार्थ्यांना नेहमी गोंधळ असतो की आता आपण पुढे करायचं काय त्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरच्यांचं मत आणि स्वतः विद्यार्थ्यांची इच्छा यामध्ये नेहमी विद्यार्थी पेचात येतात. ही व्यथा प्रत्येकासोबत होत असते कारण आई-वडील सांगतात की तू हे क्षेत्र निवड या क्षेत्रामध्ये तू पाऊल टाक याच्यात जास्त तुला स्कोप आहे पण विद्यार्थ्यांचे मित्र मात्र वेगळे सांगतात त्यांनी जे क्षेत्र घेतलेलं असतं तेच तुम्ही निवड करावे सांगतात, तसेच काही वेळेस आपल्या भाऊकी मधील किंवा आपल्या भागामधील आपले मोठे बंधू किंवा इतर नातलग यांच्यापैकी कोणी एखादा व्यक्ती विशिष्ट क्षेत्रामध्ये अग्रेसर झाला असेल तर आपले आई-वडील देखील सांगता की तू त्याच्यासारखं करायला पाहिजे. पण विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनाचं ऐकलं पाहिजे ,त्यांनी विचार केला पाहिजे की त्यांची आवड निवड कोणत्या क्षेत्रात आहे ते बघून विद्यार्थ्यांनी त्यांचं स्वतःचं क्षेत्र निवडलं पाहिजे कारण विद्यार्थी जर दुसऱ्याच्या मतावर शिकायला लागला किंवा त्याने शिक्षण मतानुसार घेतलं तर पुढे जाऊन विद्यार्थी खूपच अडचणींना जाऊ शकतो याची शक्यता असते. म्हणून सर्वात जास्त महत्त्वाची बाब म्हणजे करिअर निवडताना आपली आवड कोणत्या क्षेत्रात आहे आपण त्यानुसार आपलं करिअर घेतलं पाहिजे सध्याच्या वेळेस सर्वच क्षेत्रात खूपच स्पर्धा लागलेली आह. एखाद्या क्षेत्रामध्ये आपण किती यशस्वी होऊ ते आपल्या कौशल्य आणि आपली बौद्धिक क्षमता तसेच आपण किती त्याच्यात पारंगत आहोत याच्यावर अवलंबून असतं.कोणी विशिष्ट वर्गाने सांगितलं की हे क्षेत्र चांगलं किंवा ते चांगल त्याच्यावर अवलंबून नसत. म्हणून विद्यार्थ्यांनी कोणतेही क्षेत्र निवडताना स्वतःची आवड निवड लक्षात घेता पुढे पाऊल टाकलं पाहिजे. आजच्या लेखात आपण काही महत्त्वाचे शिक्षण क्षेत्र त्यात लागणारी पात्रता आणि त्यातून नोकरीची संधी आपण पाहणार आहोत.

आयटी क्षेत्र IT :-
सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचा होणारा वापर आणि तंत्रज्ञानाचा भविष्यातील व्याप ओळखता निश्चितपणे आयटी म्हणजेच तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध राहू शकतात आपण हे म्हणू शकतो सध्याच्या जीवनात सर्वच काही तंत्रज्ञानावर अवलंबून आहे अगदी आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या बाबतीतल्या तंत्रज्ञानाशी आपण निगडित असतो लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण आता तंत्रज्ञानाची संलग्नित आहेत आणि त्या बाबतीत कंपन्या पण खूप भरपूर प्रमाणात आहे म्हणून आयटी सेक्टर मध्ये शिक्षण घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतात.जर तुम्हाला अभियांत्रिकीच्या क्षेत्रात जायचे असेल तर त्यासाठी आयटीआय, पॉलिटेक्निक, बीटेक, बीई इत्यादी अभ्यासक्रम करता येतील. हे प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवी अभ्यासक्रम आहे. आपण आपल्या क्षमतेनुसार ते निवडू शकता.
पात्रता : राज्यातील मान्यता प्राप्त बोर्डाकडून बारावी पास असल्याचं सर्टिफिकेट त्यात किमान 50% मार्क्स असले पाहिले.तुमची बारावीची डिग्री ही विज्ञान शाखेतून असणं आवश्यक आहे. त्यात तुम्हाला Maths,physics, chemstry.विषय असणे आवश्यक आहे त्यात किमान 50% पासिंग मार्क्स असणे गरजेचे आहे त्यासोबतच तुम्हाला MHT-CET ही परीक्षा पदवी साठी द्यावी लागते आणि त्यावरच तुमचा मेरीट असतो.
जर आयआयटीमध्ये (Indian institute of technology-IIT)तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी JEE Exam तुम्हाला द्यावी लागते आणि बारावी विज्ञान शाखेतून किमान तुम्हाला Physics, Chemistry, Mathematics, या विषयात किमान 75% गुण असणे गरजेचे आहेत. IIT मधून शिकणारे विद्यार्थी चांगल्या पदावर लागून उच्च पगारावर आणि पदावर काम करतात.
वैद्यकीय क्षेत्र:
मित्रांनो वैद्यकीय क्षेत्र हे अतिशय प्रतिष्ठेचे असणारे क्षेत्र आहे आजच्या वेळेत वैद्यकीय क्षेत्राची असणारी मूलभूत गरज सगळ्यांना माहीत आहे कोरोनाच्या काळात या क्षेत्रातील लोकांच खूप अनमोल योगदान आहे. माणसाला सगळ्यात जास्त महत्वाचं हे त्याच आणि परीवाराच आरोग्य असतं.त्याच्यात बिघाड झाल्यास आपल्याला डॉक्टर, फार्मसिस्ट यांच्यासारख्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रोफेशनल व्यक्तीकडेच जावं लागतं म्हणून आपण वैद्यकीय क्षेत्र हे आजारामर क्षेत्र म्हणून आपण त्याला म्हणू शकतो.म्हणून त्याच्यात आवड असेन तर तुम्ही बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रामधून शिक्षण घेत तुम्ही कार्य करू शकता आणि अतिशय चांगल्या जागी चांगल्या पगारावर तुम्ही तुमचं काम करू शकता.किंवा डॉक्टर बनल्यावर स्वतःचा दवाखाना किंवा फार्मसिस्ट बनल्यावर स्वतःच औषधी दुकान किंवा औषध निर्माण कंपनीत तुम्ही चांगल्या पगारावर नोकरी करू शकतात. या क्षेत्रातून तुम्हाला सामान्य गोरगरिब जनतेची या मार्फत तुम्ही सेवा करण्याची संधी देखील उपलब्ध होते.
पात्रता : 12 विज्ञान मधून शाखेमधून किमान 50% मार्क्स physics ,chemitsry, Biology या विषयांतून तुम्हाला पाहिजे.
MBBS,BDS,BHMS,MABS:
12 विज्ञान मधून शाखेमधून किमान 50% मार्क्स physics ,chemitsry, Biology या विषयांतून तुम्हाला पाहिजे
NEET परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण पाहिजेत.
B.Pharmacy:
12 विज्ञान मधून शाखेमधून किमान 50% मार्क्स physics ,chemitsry, Biology या विषयांतून तुम्हाला पाहिजे
MHT - CET (PCB) पदवी प्रवेशासाठी आहे.
D.Pharmacy:
12 विज्ञान मधून शाखेमधून किमान 50% मार्क्स physics ,chemitsry, Biology या विषयांतून तुम्हाला पाहिजे.
Nursing:
12 विज्ञान मधून शाखेमधून किमान 50% मार्क्स physics ,chemitsry, Biology या विषयांतून तुम्हाला पाहिजे.
Neet,MHT-CET पदवी परीक्षा यासाठी तुम्हाला द्यावी लागेल .
कृषी क्षेत्र Agriculture :

शेती विषयक आवड असणाऱ्या मुलामुलींनी या क्षेत्रात करियर करण्याची संधी असून यात सुद्धा तुम्ही चांगल्याप्रकारे होऊ शकतात.
पात्रता:उमेदवाराने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यासह मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 किंवा समतुल्य उत्तीर्ण केलेले असावे. थेट गुणवत्तेच्या आधारावर प्रवेशासाठी, एखाद्याला ते ज्या कॉलेजमध्ये सामील होऊ इच्छितात आणि वैयक्तिक मुलाखतींना उपस्थित राहू इच्छितात त्यासाठी अर्ज करावा लागेल.
BSC: Bachelor in science:
Neet,MHT-CET पदवी परीक्षा यासाठी तुम्हाला द्यावी लागेल .
कृषी क्षेत्र Agriculture :
शेती विषयक आवड असणाऱ्या मुलामुलींनी या क्षेत्रात करियर करण्याची संधी असून यात सुद्धा तुम्ही चांगल्याप्रकारे होऊ शकतात.
पात्रता:उमेदवाराने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यासह मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 किंवा समतुल्य उत्तीर्ण केलेले असावे. थेट गुणवत्तेच्या आधारावर प्रवेशासाठी, एखाद्याला ते ज्या कॉलेजमध्ये सामील होऊ इच्छितात आणि वैयक्तिक मुलाखतींना उपस्थित राहू इच्छितात त्यासाठी अर्ज करावा लागेल.
BSC: Bachelor in science:
पात्रता: BSC प्रवेश घेण्यास इच्छुक असलेला विद्यार्थी १२वी उत्तीर्ण असला पाहिजे.१२ वी मध्ये विद्यार्थ्याने विज्ञान विषय घेतलेला असावा. १२वी मध्ये विद्यार्थ्याचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित ह्या विषयांमध्ये किमान ५०% मार्क्स हे असायला हवे.तसेच एकूण १२वी मध्ये विद्यार्थी हा ६०% गुणांनी उत्तीर्ण असला पाहिजे. जेणेकरून चांगले विद्यालय मिळायला अडचण येणार नाही. जर १०वी नंतर ३ वर्षीय डिप्लोमा केला असेल तरी सुद्धा BSC ला प्रवेश मिळू शकतो.