![]() |
शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम |
आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असे म्हणत 2 मे रोजी लोक माझे सांगाती हे शरद पवार यांच्या राजकीय आयुष्यावरील पुस्तक प्रकाशनाच्या दरम्यान भाष्य करत असताना आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करत शरद पवारांनी अचानकपणे राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याच्या निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा भयानक धक्का दिला होता .पण त्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व बड्या नेत्यांनी तसेच राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी राष्ट्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मनधरणी करत त्यांच्या त्यांना राजीनामा परत घेण्याचा हट्ट धरला पण त्या दिवशी मात्र शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. पण त्यांच्याहून पुढे हट्ट धरला तो राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्ते यांनी .तरीही मतावर ठाम राहत जोरदार आंदोलने राज्यभरात केली,राज्यभरात ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे तसेच पदाधिकाऱ्यांचे आंदोलन झाले तसेच काही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पवार यांना सुपूर्त केले हे सगळं पाहत शरद पवार त्यानंतर दोन दिवसापूर्वीच आंदोलन कर्त्यांना समजावण्यासाठी आले असता त्यांनी पाच तारखेच्या बैठकीनंतर तुम्हाला असं रस्त्यावर आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. अशी ग्वाही आंदोलन तर त्यांना दिली त्याच वेळेस बहुतांश लोकांना शरद पवार आपला निर्णय परत घेतील अशी चाहूल लागलीच होती. आणि अखेर आज दिनांक 5 मे 2023 रोजी त्यावर शिक्कामार्फत झाले .शरद पवारांच्या राजीनामावर अंतिम निर्णय घेणाऱ्या समितीने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केला त्यानंतर शरद पवार यांनी साडेपाच वाजता दिनांक पाच मे 2023 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकार परिषद घेत मी माझा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा परत घेत असल्याचे नमूद केले आणि सर्व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
- 63 वर्षाच्या प्रदीर्घ राजकारणातील कालावधीनंतर कुठेतरी आता विश्राम दिनाची माझी इच्छा होती
- आता आपण थांबावं आणि इतरांना संधी द्यावी असं माझं मत होतं.
- माणसाला स्वतःबद्दल जास्त लोभ नसावा या मताचा मी.
- या सर्व बाबींचा विचार करूनच मी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे ठरवले होते.
- पक्ष कार्यकर्त्यांच्या तीव्र उद्रेकामुळे आणि संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि माझे सांगती असलेली जनता यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली त्यामुळे त्यांच्या भावनांचा देखील आदर करण देखील तेवढेच आवश्यक.
- अध्यक्ष मी राहीन मात्र महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मी घेणार नाही.
- लवकरच पक्षाची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात.
- पक्षाची नव्याने बांधणी आखली जाणार
- तरुण व नवीन चेहऱ्यांना संधी.
- मी भाकरी फिरवायला निघालो होतो पण ती थांबली.
- कार्यकर्त्यांचे माझ्यावरील असलेले जिवापाड प्रेम हेच माझे राजकारणातील यश.
- अध्यक्ष जरी मी असलो तरी देखील पक्षाचे नाव बांधणे तसेच पक्षाचे नवीन उमेदवारांवर जबाबदाऱ्या तसेच नवीन नेतृत्व याच्यावर माझा भर असेल.
- ज्यांना सोडून जायचं आहे ते जाऊ शकतात.