धुळे जिल्ह्यातील बोरीस गावात शेतकऱ्यांनी केली कापूस व्यापाऱ्यास बेदम मारहाण.
बळीराजा आधीच निसर्ग व सरकार कळून निराश अन अजून व्यापारीही निघाले उरलेल लुटायला.
तर बातमी आहे धुळे जिल्ह्यातील बोरिस या गावात कापूस खरेदी करत असताना कापूस व्यापाऱ्या कडून शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा प्रकार राज्यातील इतर भागा प्रमाणे धुळे जिल्ह्यात पण पहावयास मिळाला.घडलेला प्रकार लक्षात येताच संतप्त शेतकऱ्याने गावकऱ्यांना बोलावून व्यापाऱ्याची गाडी अडवली आणि व्यापारी पडून जाण्याचा बेतात असताना गावकऱ्यांनी त्यांना पकडून त्यानं चागलाच चोप देत धडा शिकवला तसेच त्याची गाडी जप्त करत पोलिसांत तक्रार देखील दाखल केली असल्याचेही समजते.या घटने वरून आजुबाजूच्या गावातल्या शेतकरी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि आता शेतकऱ्याची सर्वच माध्यमातून लूट होत आहे की काय असा प्रश्न आता बिचाऱ्या गरीब शेतकरी बाधवांना पडायला लागला आहे.
निसर्गाचा प्रकोप,वरून पिकाला मिळणारा एवढा कमी भाव यावरून आधीच निराशेने जगणारा शेतकरी एवढं सगळ सहन करून आपल्यावर असणारा कर्जाचा बोजा उतरिण्यासाठी व्यापारी मागेल त्या भावात आपल सोन्यासारखे मेहनतीने आणलेलं पिकं कवडीमोल किमतीत देत असताना व्यापारी मात्र त्यात जखमेवर मीठ लावण्याचं काम करत मापात पाप करतात हे मनाला वेदना देणारी बाब आहे.मात्र शेतकरी बांधवांनी आता स्वतःला सजग बनत अशा प्रकारच्या घटना होऊ नये अशी दक्षता घेतली पाहिजे.
![]() |