हवामान खात्या कडून येणाऱ्या पुढच्या चार दिवसात महाराष्ट्रात गारपीटी सह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे या बातमी सोबतच शेतकऱ्यांना अजून समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता आहे या आधीच मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना त्रस्त केलेले असतानाच पुढील येणाऱ्या चार दिवसात गारपीटी सह जोरदार अवकाळी पाऊस येण्याची शक्यता महाराष्ट्राच्या हवामान खात्याने वरदविले आहे तसेच प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव जी डक यांनी देखील पुढच्या चार दिवसात अवकाळी पावसाचे अंदाज वर्तवले आहे म्हणून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, म्हणजेच (धुळे, जळगाव, नाशिक) तसेच विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील पिकांचे नुकसान होण्याचे देखील अंदाज वर्तवले जात आहे या आधीच अवकाळी पावसामुळे मका, केळी, पपई, कांदे, या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे आधीच चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी या अवकाळी पावसामुळे आणखी वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे ज्या भागात पावसाने आधीपासूनच नुकसान केलेले आहे त्या भागात शेतकरी बळीराजा मात्र संतप्त आहे कारण शासनाकडून कोणतेच पाणी पिकांचे पंचनामे केले जात असल्याची खंत शेतकरी बांधव व्यक्त करत आहे.
