औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी बी फार्मा नंतर पुढील शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या Gpat (Graduate Pharmacy Apptitute Test) प्रवेश परीक्षेच वेळापत्रक आधीच NTA(National Testing Agency) च्या वेबसाईट वर प्रकाशित झालेलं आहे.
त्यानुसार येत्या 22 मे रोजी राज्यातील तसेच पूर्ण देशातील विविध शहरांमध्ये ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा होणार आहे.आज त्याबाबत विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेले परीक्षा केंद्र कुठल्या शहरात आहे याची माहीत आज NTA कडून देण्यात आली.पण जस इतर प्रवेश परीक्षांत होत असते तसेच नेहमी प्रमाणे तांत्रिक समस्यांमुळे काही त्रुटी या परीक्षे बाबतीत सुद्धा पहावयास मिळाल्या कारण झालं असं की निवलेल्या शहरातल्या केंद्रातील पर्याय सोडून दुसरेच कुठले शहर बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळाले काहींना तर दुसऱ्या राज्यातलं सुद्धा परीक्षा केंद्र असणारे शहर मिळाले. या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत.आम्ही या संदर्भात विचारणा केली असता वेबसाईट वर असणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे अशी समस्या निर्माण झाली आहे असे आम्हाला NTA कडून सांगण्यात आले आहे.विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता निश्चिंत राहावे व लवकरच ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अश्याप्रकरच्या अडचणी झाल्यात त्यांना सुधारून सविस्तर केंद्र व परीक्षेचे स्लॉट याबाबत माहिती देत असताना तेव्हा आपोआपच बदल करून त्यांच्या समस्यांच निरसन होणार असल्याचे म्हणाले.
हे सुध्दा वाचा : फार्मा फ्रेशर्स विद्यार्थ्यांना अल्केम लॅबोरेटरीज येथे नोकरीची संधी